सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी दिवाळी सण तसलमात(advance)आँक्टोबर २०१६ मागणीचे printed अर्ज साक्षी झेराँक्स येथे ठेवले आहेत.सदर अर्ज भरुन मा.केंद्रप्रमुख साहेब यांचेकडे द्यावेत,तसेच ते Ganesh Dubale या facebook account किंवा bahujanteachers.blogspot.com या blogspot वरुन download करु शकता.धन्यवाद
हा blog महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक जे ज्ञानदानाबरोबरच सामाजिक कार्यात सहभागी होवून बहुजन समाजात social आणि educational awareness आणण्याचे जे काम करतात त्यांच्यासाठी वैचारिक मंच आहे.
Saturday, 8 October 2016
Sunday, 2 October 2016
लाल बहादूर शास्त्री
भारत देशाला ”जय जवान जय किसान” ( Jay jawan jay kisan )हा मंत्र देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रीचा जन्म २ आक्टोबर १९०४ मध्ये उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गावी झाला.त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांना जन्मत: वैभव लाभले नाही. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले.
** महात्मा गांधी ( Matma Gandhi ) यांचा जन्म व शास्त्रींजीचा चा जन्म एकाच तारखेला येतो. त्यांचे विचारहि एकच होते.महात्मा गांधी जींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्री जींच्या मनावर होता. शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते. महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले. त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा सर्वांच्या नजरेत भरेल असा त्यांचा पेहराव होता. साधा पेहरावां खाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणा वरून दिसून आली. राजे महाराजाच्या समोर केलेल्या भाषणात गांधी म्हणाले होते, ‘ भारतातील जनता दालीद्र्यात मरत असताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आलेत. त्यांनी अगोदर आपले जडजवाहीर विकून टाकावे व मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटावा.’ महाराजांच्या श्रीमंतीची घानाघात करणारे शब्द ऐकून अनेक राजे भर सभेतून उठून गेले. पण सभा एकण्यासाठी आलेली जनता गांधीजींच्या या भाषणाने टाळ्या वाजवून यथोचित सन्मान केला. हे दृश्य शास्त्रीजींनी पाहिले. व ते देश प्रेमाने प्रेरित झाले. त्यांचे मन अभ्यासात लागे ना तेव्हा त्यांनी शाळेला राम राम ठोकला व ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले. पण त्या नंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले.
** त्यांना ज्ञान सम्पाद्नाची विशेष हौस होती कॉलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ५ ते १० मैलाची पायपीट करावी लागायची. कॉलेज झाल्या नंतर त्यांचा एक निश्चय होता कि नोकरी न करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतरायांनी गोखल्यांच्या धर्तीवर ‘लोकसेवक समाज’ संस्था काढली व त्या द्वारे शास्त्रीजींनी अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले. स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती. ** १९२७ साली ललितादेवी यांचेशी त्यांचा विवाह झाला ( Married with lalitadevi ). त्यांचा संसार त्यांनी उत्तम रितीने केला. आपला पती लोकसेवक आहे. त्याकरिता शास्त्रीजीनचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्षता घेत. ते देशासाठी ठिकठीकाणी जावून आले तिथे तिथे आपल्या मृदू व निश्चयी शब्दांनी ती आपली छाप पाडीत. आणि आपल्या देशात काय उणे आहे दुसर्या देशापासून काय घेण्या सारखे हे त्या प्रमाणे स्वदेशी परतल्या नंतर ते कामाला लागत. २७ मे १९६४ ला नेहरूंचा( Neharuji ) अंत झाल्यानंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत:वरून दाखविले. अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले.
** शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असला तरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले.
त्याने सारे जग स्तिमित झाले आहे.भारताची मान जगात उंचावली. ”जय जवान जय किसान” या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले.
असे म्हणावेसे वाटते ~~ या देशाच्या पौरुषाचा तुच शोभतो लाल खरोखर , तुझ्या आगळ्या व्यक्तित्वाने , आम्हा दिधले नव संजीवन ! जय जवान,जय किसान,जय भारत!
Tuesday, 27 September 2016
शहीद-ए-आलम भगतसिंग
भगतसिंग- टोपननाव -भागनवाला जन्म-२७ सप्टेंबर १९०९,ल्यालपूर,पंजाब प्रांत,ब्रिटिश भारत मृत्यू -२३ मार्च १९३१
लाहोर,पंजाब प्रांत,ब्रिटिश भारत चळवळ-भारतीय स्वातंत्र्य लढा संघटना-नौजवान भारत सभा,किर्ती किसान पार्टी ,हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियन पत्रकारिता/लेखन- अकाली,अनुवाद मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम धर्म-शीख , प्रभाव-समाजवाद,कम्युनिस्ट वडील-सरदार किशनसिंग संधू ,आई- विद्यावती २३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग हे लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले.फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षे होते.भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले.अनेक वीर शहीद झाले.त्या सर्वांनाच इतिहासात मानाचे स्थान आहे.पण त्या सशस्त्र क्रांतीकारकातही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे.म्हणूनच त्यांना शहीद-ए-आलम हा किताब मरणोत्तर देण्यात आला.त्यांच्या स्मरणार्थ भारतात २३ मार्च हा दिवस *शहीद दिन*म्हणून पाळला जातो. अशा या क्रांतीकारकाला शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था,सातारा आणि रिपब्लिकन एम्प्लाँईज फेडरेशन,सातारा यांचेकडून विनम्र अभिवादन
लाहोर,पंजाब प्रांत,ब्रिटिश भारत चळवळ-भारतीय स्वातंत्र्य लढा संघटना-नौजवान भारत सभा,किर्ती किसान पार्टी ,हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियन पत्रकारिता/लेखन- अकाली,अनुवाद मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम धर्म-शीख , प्रभाव-समाजवाद,कम्युनिस्ट वडील-सरदार किशनसिंग संधू ,आई- विद्यावती २३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग हे लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले.फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षे होते.भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले.अनेक वीर शहीद झाले.त्या सर्वांनाच इतिहासात मानाचे स्थान आहे.पण त्या सशस्त्र क्रांतीकारकातही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे.म्हणूनच त्यांना शहीद-ए-आलम हा किताब मरणोत्तर देण्यात आला.त्यांच्या स्मरणार्थ भारतात २३ मार्च हा दिवस *शहीद दिन*म्हणून पाळला जातो. अशा या क्रांतीकारकाला शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था,सातारा आणि रिपब्लिकन एम्प्लाँईज फेडरेशन,सातारा यांचेकडून विनम्र अभिवादन
Sunday, 24 July 2016
साहित्य सम्राट,लोकशाहीर ,कॉम्रेड, अण्णाणाऊ साठे
"पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टक-याच्या तळहातावर तरलेली आहे...."
ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला.
हे गाव पूर्वी कुरुंदवाड संस्थानात होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.
अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसर्याअ पत्नी.चे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली.
आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती.
त्यांच्या वडिलांनी मुंबईत उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फक्त दिड दिवस शाळेत गेले.
लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत.
रेठरे गावच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली.
याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला.
मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले.
याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते.
या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले.
मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले.
इ.स.१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वतःचे वैयक्तिक जीवन मात्र धकाधकीचे होत होते.
मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्यात लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवाडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत.
मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला.
एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राज कपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.
अण्णा भाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्याा अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्ससवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले.
याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला.
अण्णा भाऊंसारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रांमधूनच वार्ताहर, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या व विचारांशी संबंधित स.ह.मोडकांच्या लोकसाहित्य प्रकाशनाने व वा.वि. भटांच्या अभिनव प्रकाशनानेच प्रथम अण्णा भाऊंच्या कादंबर्याय, कथासंग्रह, नवे तमाशे आदी नाट्यसंग्रह प्रकाशित करून जनमानसात नेण्याचे भरीव काम केले आहे.
अण्णा भाऊंच्या ‘शाहीर’ या पुस्तकास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला आहे. अण्णा भाऊंच्या ‘इमानदार’ नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यातही कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’(इप्टा) या संस्थेचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते कॉ. बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला व त्या नाटकात अभिनेते ए.के. हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. नंतर अण्णा भाऊंना ‘इप्टा’चे अखिल भारतीय अध्यक्षपदही मिळाले. ज्यात भारतभरातील सुप्रसिद्ध लेखक-कलावंत, विचारवंत त्यांच्यासोबत कार्यरत होते. अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीवरील चित्रपट निर्मितीसही ‘इप्टा’च्या कलावंतांचे मोलाचे सहकार्य लाभले...
Thursday, 30 June 2016
Subscribe to:
Posts (Atom)



