Born May 14, 1657
Purandar Fort, near Pune, India
Died March 11, 1689 (aged 31)
Tulapur-Vadhu Dist. Pune, Maharashtra, India 🏻 संभाजीराजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी झाला. जन्मस्थान: किल्ले पुरंदर, पुणे.
संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले.
त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली.
संभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला.
सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते.
शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.
मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.
राज्याभिषेक
राज्याभिषेक दिनांक: १६ जानेवारी १६८१
१६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती “हंबीरराव मोहिते” यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली.
शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला.
औरंगजेबाचे (मोगलशाहीचे) महाराष्ट्रावरील आक्रमण
शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मुगल बादशाह औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चालून आला होता.
१६८० मध्ये दिल्लीचा पातशहा, औरंगजेब महाराष्ट्रावर ५ लाखाची सेना घेवून चालून आला.
त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त २३ वर्ष होते
औरंगजेबाचा हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य संखेच्या दहा पट होता.
५ लाखांचे सैन्य, १४ कोटी खजिना, ४० हजार हत्ती, ७० हजार घोडे, ३५ हजार उंट. इतका अफाट सैन्यासागर होता कि औरंगजेबाची छावणी ३ मैलांपर्यंत पसरायची.
काही दिवसातच महाराष्ट्र आणि दख्खन जिंकून घेणार अशी अशा बाळगून आलेल्या या दिल्लीकराला संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी ७ वर्ष जुंझत ठेवला.
जोपर्यंत संभाजी महाराजांना कैद करणार नाही तोपर्यंत डोक्यावर मुकुट (शाही पगडी) घालणार नाही असा प्रणच त्याने केला होता.
नाशिक जवळचा रामशेज हा किल्ला तर फक्त ६०० मावळ्यांनी जवळपास ६ वर्ष अजिंक्य ठेवला होता.
राजमुद्रा
छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा — राजमुद्रा
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
मराठी मध्ये अर्थ:
शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व
ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त
अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही
(कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)

No comments:
Post a Comment