Thursday, 27 August 2015

विज्ञानवादी गीत

माझ्या भीमान बुद्धाला पेरलं व,
आम्ही देव्हारं बाजूला सारलं व...
तेहत्तीस कोटी देवांचा जथ्था,
एकाचा बी लागना पता.
हे थोतांड,
भीमानं हेरलं व … आम्ही देव्हारं बाजूला सारलं व..
अवतारी बुवा अवतारी माता,
चमत्काराच्या सांगत्यात कथा
अशा भोन्दुंच
सतसंग भरलं व …आम्ही देव्हारं बाजूला सारलं व..
राशीभविष्य कुंडली बघा
मंगळ शनि अव देईल दगा
या भामट्यान,
पाकीट मारलं व … आम्ही देव्हारं बाजूला सारलं व..
पंढरीचे बडवे शिरडी तिरुपती,
ट्रस्टी झाले अहो करोडपती.
काळ्या पैशाला,
मठांनी तारलं व … आम्ही देव्हारं बाजूला सारलं व..
कर्मकांडाच डोई हे वझ,
माणूसपणाला केलया खुज.
अंधश्रद्धेनं,
मानसाला घेरलं व … आम्ही देव्हारं बाजूला सारलं व..
धर्म बनवला अफूची गोळी
धर्माची त्यांनी बांधली टोळी
या टोळीनं
माणसाला मारलं व … आम्ही देव्हारं बाजूला सारलं व..
भोंदुगिरीला मारुनं ठोसा
विज्ञानाचा घेउनी वसा
डोक भानावर,
ठेवायचं ठरलं व … आम्ही देव्हारं बाजूला सारलं व..
रचना - सचिन माळी.
सादरकर्ते - कबीर कला मंच

No comments:

Post a Comment