Thursday, 6 August 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा राज्यसभेत
होते तेव्हा ते संसदेचे सत्र सुरु होण्याच्या
काही वेळ अगोदरच आपल्या आसनावर जाऊन
बसत असत...
.
हे रुबाबदार व्यक्तीमत्व जेव्हा संसदेत जात
तेव्हा मोठमोठी पुस्तके त्यांच्यासोबत
असत...
त्या पुस्तकांचा रेफरन्स देऊन ते संपूर्ण संसद
गाजवून टाकत असत...
आणि हा त्यांच् रुबाब पाहून भलेभले त्यांचाशी
नजर मिळवीत नसत...
.
एक दिवशी बाबासाहेब आपल्या जागेवर
बसलेले होते.
आणि त्याच वेळेला नेहरू तिथे आले...
बाबासाहेबांचे लक्ष एकाग्र पुस्तकात होते.
.
नेहरू जेव्हा बाबासाहेबांच्या जवळ आले,
तेव्हा त्यांनी गमतीत आपली गांधी टोपी काढून
बाबासाहेबांच्या डोक्यावर ठेवली...
बाबासाहेबांचे लक्ष अजूनही पुस्तकात होते.
.
जेव्हा बाबासाहेबांचे वाचन झाले तेव्हा डोक्यावर
कोणी काय ठेवले हे बघण्यासाठी बाबासाहेबांनी
मागे वळून पहिले...
त्यावेळी नेहरू त्यांच्यामागे उभे राहून हसत होते.
.
हा सारा प्रकार जवळच उभे असलेले परभणी
( पाथरी ) चे खासदार दे. ना. कांबळे
पाहत होते...
.
त्यावेळी बाबासाहेबांनी
शांतपणे नेहरूंना उत्तर दिलं...
.
" Mr. Nehru...
Politics is a Game For you,
But it is a mission for me..."
‪#‎जय_भीम‬...

No comments:

Post a Comment