Wednesday, 14 October 2015

कासच्या कुमुदिनी तलावाचे सौंदर्य

काल सुट्टीमुळे सहकुटुंब कासची फुले पाहण्याचा बेत आखला.बहुतांशी पर्यटक हे net वर फोटो पाहून त्याप्रमाणे फुले आहेत का?हे पाहतात,आणि ज्या अपेक्षेने आलेली असतात तशा प्रकारची फुले पाहायला मिळाली नाहीत तर निराश होतात वास्तविक हा निसर्गाचा चमत्कार असतो फुले कमी-जास्त उमलायला पाऊस,ढग तसेच अनेक जैविक घटक कारणीभूत असतात.                                                      
  पण काल निसर्गाचे अद्वैत,अदभुत असे रूप पाहायला मिळाले ते कुमुदिनी तलावात.बहुतांशी सातारावासियांना सुद्धा याची माहिती नाही.या तलावात वेगळ्या प्रकारची कमळे सकाळी ७ ते दुपारी २पर्यंत उमललेली असतात,ते मनोहर दृश्य पाहून काही काळ स्तब्ध झाल्यासारखे वाटले .तसेच ज्याप्रमाणे discovery,animal plannet channel वर समुद्रात शैवाल सारख्या वनस्पती पाण्यात पाहतो त्याप्रमाणे येथे वनस्पती आहेत so please ज्यांनी कुणी कुमुदिनी तलाव पाहिला नसेल त्यांनी जरुर पहा आणि आपल्या दूरच्या मित्रांना,नातेवाईक यांना सांगा व आपल्या सातारच्या पर्यटनाला चालना द्या .धन्यवाद शब्दांकन-गणेश दुबळे सर सातारा 9326655211 email-dubale.ganesh@gmail.com blog_bahujanteachers.blogspot.com/sataracitizens.blogspot.com

No comments:

Post a Comment