Friday, 16 October 2015

Dr.Narendra Dabholkar-असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी.

छाती ठोकून सांगतोय

मुर्त्यांना पुजण्यापेक्षा
माणूसकीला पूजतो मी
काल्पनिक देवांना न मानता
फुले,शाहू,आंबेडकरांना वाचतो मी.|
छाती ठोकून सांगतोय,
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी.||

पोथ्या,पुराणे  वाचण्यापेक्षा
शिवरायांना वाचतो मी
दगडासमोर त्या कशाला झुकू ?
जिजाई,सावित्री,रमाईपुढे नतमस्तक होतो मी.|
छाती ठोकून सांगतोय
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी.||

घामाचे पैसे दानपेटीत टाकून
भटांची घरे भरत नाही मी,
तहानलेल्यांना पाणी, भूकेलेल्यांना अन्न देऊन
त्यांच्यातच देव शोधतो मी.|
छाती ठोकून सांगतोय
असत्य नाकारणारा नास्तिक
आहे मी.|
कर्मकांडाला श्रेष्ठ समजत नाही मी,
मंत्र,होमहवन,कर्मकांड यांना
पायाखाली तुडवून
मनगटावर भरवसा ठेवतो मी.|
छाती ठोकून सांगतोय
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी.||

हिंदू,मुस्लिम,सिख,ईसाई म्हणून
जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगतो मी,
धर्मातील पाखंडांना न जपता
माणूसपणालाच जपतो मी
छाती ठोकून सांगतोय.|
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी.||

मांजर आडवी गेली म्हणून न थांबता
थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी.
अंधश्रद्धेला मातीत लोळवून
विज्ञानवाद स्विकारतो मी.|
छाती ठोकून सांगतोय,
असत्य नाकारणारा नास्तिक
आहे मी.|

-डॉ.नरेन्द्र दाभोळकर

(महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष)

(माणूस जरी संपवला तरी त्याचे विचार कधीच नाही संपवू शकत)

No comments:

Post a Comment