Monday, 7 November 2016

डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक शाळा प्रवेश दिन- ७ नोव्हेंबर

*डाँ.बाबासाहेब आंबेडकर,७ नोव्हेंबर,शाळा प्रवेश दिन*  रत्नागिरी जिल्हा फणस, आंबा यांसारख्या  फळांच्या रत्नाचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जवळ आंबवडे नावाचे खेडे आहे. तेथे रामजी सपकाळ नावाचा सरदारी बाण्याचा, जातीने महार आचरणाने व विचाराने सुसंस्कृत असलेला इसम राहत होता. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने लष्करात प्रवेश केला. शिक्षणाची आवड असल्याने नोकरी बरोबर त्याचे शिक्षणही चालूच होते. लष्करातील मेजर मुरवाडकर यांची थोरली मुलगी भीमाबाई हि रामजीची बायको. भीमा बाई दिसण्यास सुरेख होती. स्पष्टवक्तेपणा मुळे तिचा सर्वांवर वचक होता.  अश्या या रामजीचे आणि भिमाबाईचे दिवस आनंदात व मजेत चालले होते.  सोमवार दिनांक १४ एप्रिल १८९१ सालची पहाट.अतिशय मंगल पहाट होती ! सूर्य-चंद्र ईत्यादी ग्रहांचा पवित्र मिलाप झाल्याचा तो दिवस होता. तो दिवस भाग्याचा व पुन्न्याचा समजला गेला.त्याच वेळी भीमा बाईला पुत्ररत्न झाले. बाराव्या दिवशी मुलाचे भीमराव असे नाव ठेवण्यात आले.

 रामजी मेजर च्या हुद्यावर असताना  सातारयास राहण्यास आले.भिमाचा खोडकर स्वभाव जावा म्हणून त्याला कँम्प मध्ये टाकण्यात आले. सातार्याचे वातावरण भीमा बाई ना लाभदायक नव्हते. त्यांची तब्येत वारंवार बिघडत असे. त्यामुळे त्यांनी कायमचे अंथरून घरले. आणि लवकरच त्या मृत्यू पावल्या. त्यावेळी भीमराव अवघ्या सहा वर्षाचे होते.

इ.सन.७ नोव्हेंबर १९०० मध्ये भीमराव सातारा हायस्कूल मध्ये इंग्रजी १ ल्या इयत्तेत  शिक्षणासाठी दाखल झाले. इंग्रजी  शाळेत प्रवेश झाल्याने भीमाला ती शाळा फारच आवडली.
याच शाळेत त्यांना पहिल्यांदा जातीयवादाची ओळख झाली.शाळेच्या बाहेर बसून त्यांनाच शिक्षण घ्यावे लागले.घशाला कोरडचृ पडली तरीही पाणी समोर दिसत असतानाही पिता येत नव्हते.कारण महार असल्याने पाण्याच्या भांड्याला किंवा हौदाला स्पर्श करण्याची मुभा नव्हती.तरीही त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतले. याच शाळेत शिकवणारया एका ब्राह्मण शिक्षकांने आपले आडनाव बाबासाहेबांना दिले.आणि येथेच  सपकाळ(आंबावडेकर )चे  आंबेडकर झाले. ७ नोव्हेंबर १९०० ते मार्च १९०४ पर्यंत या इंग्रजी शाळेत फी भरुन त्यांनी शिक्षण घेतले.(त्यावेळी मोफत शिक्षण नव्हते.) त्यामुळे ७ नोव्हेंबर हा दिवस भारतीयांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि ऐतिहासिक आहे.या दिवसामुळे भारताचा तसेच जगाचा इतिहास बदलून गेला. त्यांच्या या अफाट आणि अतुलनिय कार्यास माझा क्रांतीकारी जयभीम. 🙏🏻🙏🏻       bahujanteachers.blogspot.com / sataracitizens.blogspot.com

No comments:

Post a Comment