Saturday, 29 August 2015

भवानी तलवार नव्हे पोर्तुगीज तलवार

भोळ्याभाबड्या शिवभक्त रयतेमध्ये शिवाजीच्या यशाचं एक कारण पुनःपुन्हा सांगुन रुजवलं गेलय ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानीमाता प्रसन्न झाली होती म्हणून शिवाजी यशस्वी झाला.

शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती हे आता संशोधकांनी दाखवून दिले आहे पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा तेव्हा प्रगत होते.

पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली तिथून ती सावंताकडे गेली व तिथून शिवाजी महाराजांकडे आली असा खरा इतिहास आहे.

या तलवारीशी भवानी मातेचा काही संबंध नाही. सातारा इथे एक म्युझिअम आहे त्यात एक तलवार आहे.
ही तलवार शिवाजी महाराज वापरीत असे सांगीतले जाते या तलवारीवर पोर्तुगीज भाषेतील अक्षरे आहेत आजही ती कुणासही पाहता येईल.

लोकांचा अडाणीपना लोकांची स्रद्धा हेच आपले भांडवल करुन लग्गा साधु पाहणारे लोकांना सत्य समजु देण्यास तयार नसतात.

संदर्भ : शिवाजी कोण होता ?
लेखक :- कॉ. गोविंद पानसरे....!

No comments:

Post a Comment