😃 भेटलेले अन् न भेटलेले 😔
सुनील शेडगे (नागठाणे)
अण्णाभाऊ साठे हे मराठीतले सिद्धहस्त लेखक. लौकिकार्थानं त्यांनी शाळेची पायरी कधीही चढली नाही. मात्र त्यांच्या शब्दांचा गंध अगदी परदेशात पोहचला. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे कित्येक नायक त्यांनी आपल्या कथा- कादंब-यांतून उभे केले. त्यावर पुढे चित्रपटही निघाले.
अण्णाभाऊ हे सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे.
त्याच परिसरातलं आणखी एक गाव म्हणजे बहे बोरगाव (ता. वाळवा). समर्थांनी अकरा मारूतींची स्थापना केली. त्यापैकी एक याच बोरगावात. कृष्णा नदीतीरी हे रम्य, सुबक देवालय आहे.
बापू बिरुंचं हेच गाव. गावाला वेढीस
धरणा-या गावगुंडाना, सावकारांना बापूंनी यमसदनी धाडलं. त्यांचं नाव काढताच अशा प्रवृत्ती अगदी चळाचळा कापत. सामान्यांसाठी मात्र ते गळ्यातला ताईत होते.
त्यामुळंच तब्बल ३० वर्षे ते पोलिसांना गुंगारा देत राहिले. नंतरच्या काळात त्यांना जन्मठेप झाली. त्यांच्या या प्रवासावर चित्रपट, वगनाट्य, पोवाडा निघाला. शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांनी स्वतःला आध्यात्मिकतेशी जोडून घेतलं.
अलिकडच्या काळात त्यांच्याशी भेटण्याचा योग आला. योगायोग म्हणजे ते भेटले बोरगावातच. अर्थात सातारा तालुक्यातील!
विजय पवार हा माझा नागठाण्यातील पत्रकार मित्र. तो उत्तम फोटोग्राफर आहे. त्याचा दांडगा जनसंपर्कही आहे. त्याच्या सोबतीनं बापूंना भेटता आलं. एका खासगी कार्यक्रमाला ते आले होते.
धिप्पाड देहयष्टी, रापलेला चेहरा, पांढरी दाढी, पिवळा पटका, धोतर अन् खमीस, घोंगड्याची खोळ केलेली, ती डाव्या खांद्यावर. हातात स्वतःच्या उंचीएवढी जाडजूड काठी. तिला
सिंहाकृती पितळी मूठ.
त्यांना पाहिलं, तरी जरब बसावं असं व्यक्तिमत्व. मग बोलणं तर दूर की बात.
तरीही आम्ही कशीबशी सुरुवात केली. मग हळूहळू गप्पा रंगत गेल्या.
पहाटे उठणं, दोन लीटर दूधाचा रोजचा रतीब,
अंग मेहनत करणं. त्यातून बापू नव्वदीच्या घरात आहेत, असं वाटतही नव्हतं. आपण पूर्ण शाकाहारी असल्याचं सांगून त्यांनी आम्हांला आश्चर्याचा धक्का दिला.
सध्या ते व्यसनमुक्तीविषयी प्रबोधनाचं काम करतात. अर्थात कुणी कुणावर अन्याय केलेला त्यांना आज या वयातही खपत नाही!
२९ ऑगस्ट, शनिवार
sunilshedage@hotmail.com

No comments:
Post a Comment