www.teach-nology.com › currenttrends ज्ञानरचनावाद दूतांसाठी खास(भाग १)
1)वर्गात सर्वांना बोलण्याची संधी द्या.शांत असणारी मुले बोलती करा.
२)मुलांस बोलणे व ऐकणेस प्रोत्साहन द्या.
३)सुचना सुटसुटीत सावकाश स्पष्ट शब्दात द्या.
४)शिकवताना लवचिकता ठेवा.
५)धीराने ऐकुन घ्या.विकासास पोषक कृती घ्या.भावना प्रकटीकरण संधी द्या.
६)मुलांस स्वतःचे निर्णय स्वतः घेवु द्या.बोलणार्यास चुकाबद्दल टोचु नका.
श्रवणकौशल्यविकासास उपक्रम
१)मुलांस चार शब्द सांगा व गटात न बसणारा शब्द ओळखणेस सांगा.
२)चार चित्रे ,किंवा शब्दपटट्या सांगीतलेल्या क्रमाने ठेवणे.
३)सुचना ऐकवणे.
४)संवाद टेप ऐकवणे.
संभाषणकौशल्यविकास उपक्रम
१)अक्षरे पाच क्रमाने वाचणे.
२)शब्दांचे क्रमाने वाचन.
३)न अडखळता बोलणे कथाकथन.
४)प्रसंगवर्णन करणे.
५)भुमिकाअभिनय करणे.
६)प्रसंगाचे नाट्यीकरण करणे.
७)प्रश्न विचारणे व उत्तर देणे.
ज्ञानरचनावाददूतांसाठी खास भाग २
वाचन म्हणजे फक्त अक्षरांचे उच्चार करणे नाही.
वाचन म्हणजे सांकेतिक चिन्हांच्या आधारे शब्दांचा उच्चार करुन शब्दात दडलेला अर्थ समजुन घेणे.म्हणजेच लिखित मजकुराचा अर्थ कळणे आहे.
वाचनपुर्वतयारी
१)नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे
२)डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.
३)बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात समजणे.
४)दृश्य शब्दसंग्रह=उपक्रम १)मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा.
मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल.२)वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस३)परिचयाच्या चित्रांचा वापर करुन पुढील खेळ घेणे.
सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा.चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.
४) दहा शब्द झाले की वाक्यवाचन सुरु करावे.हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे.नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.
अक्षरपरिचय कसा शिकवावा?
अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा क शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा.आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा.आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.
गृहपाठ=वर्तमानपत्रातील क कापुन आणणे.
अक्षरदृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेणे.
स्वरचिन्हपरिचय
पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.
स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षरपरिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा.
वाक्यवाचन
मुले शब्द तयार करु लागली की छैट्या वाक्याची पुस्तके वाचण्यास द्यावीत.प्रत्येक पानावर चित्र व एक वाक्य सहा वाक्याचे पुस्तक बनवणे.जमतील तशी चित्रे काढावीत.मुलांचा वाचनाचा आत्मविश्वास वाढत जाईल.
जोडाक्षराचे वाचन
एकच प्रकारचे जोडाक्षर शब्द मोठ्याने वाचुन मुलांसमोर ठेवावा.कात्रीने अक्षर जोडणी कापुन दोन्हीचे उच्चार करुन दाखवावेत.जोडाक्षर बनविणे नंतर सारख्या जोडाक्षरी शब्दवाचनाचा सराव घेणे.र चे चार प्रकार शिकवणे.
परिच्छेद आकलन
दैनंदिन कामावरील परिच्छेद वाचणे.त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
प्रकटवाचन
योग्य ठिकाणी विराम घेणे व योग्य स्वराघातासह वाचन करणे महत्वाचे.शिक्षकांनी उतारा वाचुन दाखवावा.शिक्षकांमागोमाग एकएक वाक्य विद्यार्थी वाचतील.पुन्हा पुर्ण उतारा विद्यार्थी योग्य विराम व स्वराघातासह वाचतील.
वाचनसाहित्य भरपुर हवे.
परिच्छेदवाचन
शब्दडोंगर वाचन घेणे.अधिक शब्दांचे वाक्य वाचुन आकलन होणे महत्वाचे आहे.

No comments:
Post a Comment