Friday, 2 October 2015

History of Dalit panther in maharastra


    "जो समाज इतिहास विसरतो , तो समाज इतिहास कधीच घडवू शकत नाही"
 
  --डॉ. बाबासाहेब आंबेडकर
   

           आंम्बेडकरी चळवळीचा सुवर्ण काळ म्हणजे दलित पँथर चा काळ....

दिनांक 29 में 1972 रोजी दलित पँथर चा जन्म झाला.
    त्या काळात दलित पँथर हा एक झंझावात होता. या प्रभावशाली झंझावाताने पालापचोळा उडवून लावला होता ! वाढत्या अन्याय अत्याचारचा बिमोड करण्यासाठी जन्मलेल्या या ज्वालाग्रही संघटनेने अम्बेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण केले.संघटनेचे रूपांतर खळखलत्या अणि सलसळत्या चळवळीत झाले ...!
 
        बेभान झालेला तरुण रस्त्यावर लढत होता ! प्रत्येक तरुण एक चळवळ होत होता. व्यवस्थेसी टक्कर घेत होता . पिडीतांना दिलासा देत होता . तो छोटासा काळ होता. परंतु त्यांनी शासनाला जाग आणली होती. राजकीय पक्षांना भानावर आणले होते.  उपेक्षिता वरील अन्यायला वाचा फोडली होती.
अन्यायी प्रवृतिची नांगी ठेचली.. !
 
             दलित पँथर चा लढ़ा केवळ सम्पती साठी नव्हता. तो होता घटनात्मक अधिकारांची अमलंबजावनी करण्यासाठी , तो होता समतेची प्रस्थापना करण्यासाठी , तो होता स्वतंत्र्याचे मोल जपन्यासाठी, तो होता समाजात बंधुभावना निर्माण करण्यासाठी, तो होता माणसाला मानुसपण बहाल करण्या साठी, तो होता श्रमाला,घामाला किम्मत मिळवून देण्यासाठी ....
प्रतिष्ठा देण्यासाठी.. !
          त्या मुळेच खैरलांजी, सोनई, खर्डा, अणि आता शिर्डी सारख्या घटना घडल्यास आपसुखच उच्चारले जाते "आज दलित पँथर सारखी जहाल संघटना असती तर..... !"
 
 दलित पँथर संघटना स्थापन होण्यास करणीभूत ठरलेल्या घटना पैकी एक घटना म्हणजे पुणे जिल्ह्यातील इन्दापुर येथील बावडा या गावी घडलेली घटना ! सम्पूर्ण गावाने तेथील बौद्धावर बहिष्कार टाकला होता. त्याच वेळेस परभणी जिल्ह्यातील ब्राम्हण गांव या ठिकाणी मणुसकीला कलंक लावनारा प्रकार घडला .

 14 में 1972 ला बौद्ध वस्तीतील दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. कारण काय तर विहिरिवर पानी पिण्या चा प्रयत्न केला म्हणून.. त्यांच्या गुप्तांगवर बाभळीच्या काट्यांचे फटके मारत गावभर नग्न फिरवण्यात आले.. !
   
         त्यातच एक घटना घडली ती म्हणजे 10 एप्रिल 1970 ला दलितांवरच्या अन्याय अत्याचारा बाबतचा पेरुमल समितीचा अहवाल. संसदेच्या पटलावर मांडण्यात आला . सद् विवेक बुद्धी असलेल्या माणसाची मान शरमेंनी खाली जावी असा तो अहवाल होता . माणूसकीला काळीमा फासनारा असा तो अहवाल होता.
अन्याय करणारे काँग्रेसवाले होते, ब्राम्हण, ब्रम्हणेतर होते.
   
त्या अहवालानुसार एका वर्षात देशभर 1177 दलितांचे खून झाले. असे नोंदविन्यात आले होते. प्रत्यक्षात ही संख्या 11000 पेक्षा जास्त होती . दलित स्त्रियांची धिंड काढ़ायचे, बलात्कार करायचे, पानवठे बाटवले म्हणून बेदम मारहाण करनारे,पाटलासमोर नविन कपडे घालून आल्यामुळे चाबका चे फटके खानारे,पायात चप्पल घातली म्हणून चपलेने तोंड फोड़नारे, ज़मीन  बळकवनारे, मजुराना कायमचे दास्यात ठेवणारे, दलितांच्या पाणवठयावर विष्टा टाकनारे अनेक प्रकार नोंदविन्यात आले होते !
 तसेच शहरातील सुप्त जातीयवदाचे दर्शन या अहवालात करण्यात आले होते ...!
      मुंबईतील अलंकार सिनेमा ते ओपेरा हॉउस दरम्यान चालत असताना ज. वि. पवार व नामदेव ढसाळ यांनी निर्णय घेतला की अशा अन्याय अत्याचारला पायबंद घालण्यासाठी एखादी जहाल संघटना स्थापन्याचा.. ! म्हणजे दलित पँथर चा जन्म रस्त्यात झाला अणि लढ़े उभारले ते ही रस्त्यावर उतरुणच.... !
   
  पँथर ची स्थापना जरी ढसाळ व ज. वि. पवार यांनी केली असली तरी त्याचे संवर्धन राजा ढाले यांनी केले. त्यांनी संघटन वाढवले ...!
         स्वतंत्र्याच्या रौप्य मोहतस्वी वर्षात राजा ढालेनी साधना या सप्ताहिकात लिहलेला "काळा स्वतन्त्र दिन" लेख हा वादळी ठरला !  त्यांनी आपल्या लेखात म्हटले, "ब्राम्हणाच्या बाई चा कसोटा ब्राम्हणगावात सोडला जात नाही, जातो बौद्ध स्त्री चा, नी याला शिक्षा काय, तर 1 महीना शिक्षा नाहीतर 50 रूपए दंड..! साला राष्ट्रगीताचा अपमान केला तर उठून उभा नाही राहिले तर ठीक नाही 300 रुपये दंड, प्रतिकांचा अपमान झाला तर दंड नी सोन्ना गावच्या सोन्या सारख्या प्रत्यक्षातील हलत्या बोलत्या स्त्री चे पातळ फेडल तर 50 रूपए दंड। अशी जहाल टिका साधना मासिक तुन केली..!
       दुर्गा भागवत ह्या त्या काळचे मोठे व्यक्तिमत्व होते त्यांनी एका सभेत वक्तव्य केले की "वेश्या व्यवसाय हा समाजासाठी आवश्यक आहे पुरषी
वासनांची पूर्तता करुण वेश्या समाजाचा तोल सांभाळत आहेत त्यामुळे वेश्या व्यवसायला सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे.."

त्या वर एक युवक उठून म्हणाला की "मग त्या व्यवसायची सुरवात तुमच्या पासून होऊ दया" तो युवक होते राजा ढाले. ह्या घटनेने खळबळ माजवली.
         वरळी नायगांव येथे  पँथर ची सभा होणार होती. शिवसेनेने  (वसंत सेना) वरळी नाक्यावर एक फलक लावला होता त्या फलकावर हिन्दू देव देवतांची निर्भत्सना करणाऱ्या पँथरला धडा शिकवण्याचा जाहिर आश्वासन देण्यात आले होते . या फलका मुळे वातावरण संतप्त झाले होते.

सभेच्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण होते. ढसाळ यानी भाषणात त्रिशूलचा उल्लेख केल्यावर एक दगड स्टेज वर पडला. त्यांच्या भाषणानंतर राजा ढाले माईक जवळ येताच प्रचंड दगडाचा वर्षाव झाला. तो पूर्व नियोजित होता . ज. वि. पवारांनी पोलिसांना आवाहन केले की गुंडाना अटकाव घालावा. मात्र पोलिस सभेला आलेल्या लोकांवर लाठीमार करू लागले. एका पोलिसाने स्पीकर बंद करण्यास सांगितले. (पोलिसांच्या मुलांनी आपल्या वडिलांचे गणवेश घालून लाठीमार केला असे बोलले जाते) दगडांचा भाडीमार सुरु होता.
पोलिसांचा निषेध करण्या साठी स्त्रियांचा प्रचंड मोर्चा निघाला. दगड ज्या दिशेने येत होते तेथे पोलिस पाठवा. असे ढाले यांनी डी. सी. पी. ना सांगण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांच्यावर प्रचंड लाठिहल्ला केला. ढाले रक्त बंबाळ झाले. त्यांचे हाताचे एक बोट मोडले. दयानंद म्हस्के जख्मी झाले. दंगलीचा आगडोंब उसळला.

कोंग्रेस - रिपब्लिकन युतीचा धिक्कार पोलिस राजचा धिक्कार आम्बेडकरांचा विजय असो.. आशा घोषणा देत होते.

 स्त्रियांच्या मोर्चावर इमारतींच्या गच्चीवरुण दगड, सोडा वाटरचे बोटेलचा वर्षाव होत होता. वरुण मसाला वाटायचा पाटा कुणीतरी सोडला. तो एका वृद्ध आजीवर पडणार तोच भगवत जाधवाने तो आपल्या अंगावर झेलला ! भागवत रक्ताच्या थारोळयात पडला .
 शहीद झाला !
     
दलित पँथर ही चळवळ सम्पूर्ण भारत भर फोफवू लागली दलित पँथर च्या छवण्या अनेक राज्यात सुरु झाल्या त्यामधे दलित पँथर गुजरात, दलित पँथर दिल्ली, दलित पँथर मद्रास, दलित पँथर मध्यप्रदेश,दलित पँथर आंध्र प्रदेश,दलित पँथर कर्णाटक,दलित पँथर पंजाब व भारता बाहेर लण्डन येथे दलित पँथर ची स्थापना झाली.
        पँथर नामदेव ढसाल,राजा ढाले, ज वि पवार, अविनाश महतेकर, अरुण कांबळे, दयानंद म्हस्के,के बी गमरे(लंडन),गंगाधर गाड़े, भाई संगारे,रामदास आठवले, उमाकांत रणधीर,चेंदवंकर,एमेस अंधेरिकर,अरविन्द निकाळजे,दादा भाउ साळवे,रतन कुमार पाटलीपुत्र,सी रा जाधव असे अगणित खेड्या पड़यातील युवक तसेच युक्रांद चे कुमार सप्तर्षि, हुसेन दलवई,भालचंद्र मुणगेकर यांना व त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम...!
        पँथरच्या त्यागाची आठवण करुण देने हाच या लेख संकलित करण्या मागचा हेतू आहे ...!

      

No comments:

Post a Comment