Wednesday, 21 October 2015

"देवावर श्रध्दा" -एक मानसिक आजार

🍀  देवावर श्रध्दा " ह्या विषयावर अमेरिकेत अनेक वर्षांपासुन संशोधन सुरु होत.
शेवटी "देवावर श्रध्दा हा मानसिक आजार आहे" असे तेथील Psychological Associaon ने जाहीर केले.

सर्वप्रथम भारतात " चार्वाक" यांनी असे म्हटले की प्रमाणाशिवाय कशालाही मान्यता देवु नये".
त्यानंतर बुध्द आले. बुध्द हे मनोवैज्ञा निक होते. त्यांनी
यावर अनेक वर्ष चिन्तन केले, शेवटी
त्यानी देव ह्या शब्दालाच तिलान्जली दिली.
बुध्द म्हणतात एखादी गोष्ट अनुश्रयावरुन
म्हणजे ऐकीव माहितीवरुन स्वीकारु नका.
परम्परा आहे म्हणुन स्वीकारु नका.
कोणी तरी असे असे म्हणत आहे म्हणून स्वीकारु नका.
एखादी गोष्ट पिटकातून आली आहे एवढ्यावरुन स्वीकारु नका.
बाह्य रुपाचा विचार करुन स्वीकारु नका . अन्दाज
बांधण्याचा आनंदज्ञमिळतो म्हणून स्विकारु नका
(किंवा ऐखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे
म्हणून स्विकारु नका.) (सागणार्‍याचे) सुंन्दर रुप पाहुन
स्विकारु नका. (किंवा सम्भाव्यता आहे
एवढ्यावरुन स्वीकारु नका.) हा श्रमण आपला गुरु आहे,
असा विचार करुन स्वीकारु नका.
अश्याप्रकारचे विचार
पसरवुन बुध्दानी माणसाच्या मनामधे बुध्दिप्रामाण्यवाद
रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय इतर अवैज्ञानिक
रुढी, परम्परा, देव याचा समावेश धम्मात होवु नये ,
याची पुरेसी काळजी बुध्दाने घेतलेली आहे.
यानंतर बुध्द धम्माची पिछेहाट झाली.
मनुवाद पुढे आला आणि बुध्दिपामण्यवाद मागे पडला .
बुध्दाचे मुळ तत्वज्ञान चा आपल्याला विसर पडला .
भारतात मानवी मेन्दु गोठवण्याचे तत्वज्ञान पेरण्यात आले.
परिणाम हा झाला की त्यामुळे धर्म विरुध्द विज्ञान ही
लढाई फक्त युरोप मधेच सुरु झाली.
भारतामध्ये ही लढाई सुरु झालीच नाही,
आजही आपण विज्ञान स्वीकारत नाही.
आपण फक्त तंत्रज्ञान स्वीकारतो.
आपल्या देश्यात
अणुभट्टीमधे काम करणारा मणुस सुध्दा भलमोठे
गन्ध लावून जातो. इथल्या धर्मग्रन्थानी
विचार निर्माण होण्याकरिता
माणसामध्ये मेंदुच शिल्लक ठेवला नाही.
इश्वर कोणीही पाहीलेला नाही, त्याला काहीही प्रमाण
नाही. तरीही आपण त्याचे पुजन करतो. त्याचे नमन
करतो. मला जे काही मिळालेले आहे ते
ईश्वराच्याच क्रुपेने मिळालेले
आहे असे मानतो. ही मानसिक गुलामगिरी आहे.
जे मुळात अस्तित्वाचच नाही. त्याला
मान्यता देणे, त्याची पुजा करणे ही मानसिक
विक्रुतीच आहे. हा मानसिक आजार आहे.
अमेरिकेतील Phychological Association
नी जगासमोर मान्डलेले सशोधन हा चार्वाक आणी
बुध्द विचारांचा विजय आहे.
पुन्हा ऐकदा देवाचं विसर्जन करु या , अंधश्रध्येच्या
बेड्या तोडु या . देव, धर्म , रुढी ,परम्परा, कर्मकान्ड
भविष्य ,बुवाबाजी अंधश्रध्देचा हा हजार पायांचा ओक्टोपस
याला कायमचे मनातुन काढु या.
व्यक्तिस्वातत्र्यांचे आत्मतत्वच गहाण
टाकणा-या या देवाला कायमचं रिटायर करु या  🍀

नास्तीक बनो ... निर्भय बनो

No comments:

Post a Comment