Monday, 16 November 2015

चल प्रिये आपण प्रेम करायचं ...!!!

चल प्रिये आपण प्रेम करायचं!
कधी तु सई मी शिवबा बनायचं,
अन्यायाविरोध दोघानी चार हात करायचं
स्वाभिमानाची बिज साऱ्यांच्यात पेरायचं.
चल प्रिये आपण प्रेम करायचं!
चल प्रिये आपण प्रेम करायचं.
कधी मी ज्योती,तु साऊ बनायचं
अज्ञानाना शिक्षित करायच,क्रांतिची मुळाक्षरे गिरवून घ्यायचं.
चल प्रिये आपण प्रेम करायचं.
चल प्रिये आपण प्रेम करायचं.
कधी तु रमा अन् मी भिमा बनायचं,
गुलामगिरिच बंदपाश तोडून टाकायचं.
समतेच जिन जगायला शिकवायचं
चल प्रिये आपण प्रेम करायचं.

चल प्रिये आपण प्रेम करायचं!

कधी तु लक्ष्मी, कधी मी भाऊराव बनायचं,
भुकेला अन्न, अडान्याना शिक्षण,आणि रिकाम्या हाताला काम द्यायचं
चल प्रिये आपण प्रेम करायचं.
चल प्रिये आपण प्रेम करायचं.
सत्य अहिंसा शांती समता बंधुता या तत्वाना कधी नाही तोडायचं
पंचशीलेनच सार आयुष्य व्यथित करायच
चल प्रिये आपण प्रेम करायचं.

चल प्रिये आपण प्रेम करायचं.
जिजाऊंच्या स्वप्नातील रयतेच्या स्वराज्याचं, आणि..
प्रबुद्ध भारताचं बाबांच स्वप्न आपणच पूर्ण करायचं
अशोकचक्राच्या तिरंग्याखाली साऱ्याना एकत्र करायचं
चल प्रिये आपण प्रेम करायचं...!!!
 चल प्रिये आपण प्रेम करायचं...!!!

1 comment: