Friday, 13 November 2015

What is google drive?

गुगल ड्राइव्ह म्हणजे काय?

गुगल ड्राइव्ह ही गुगलची क्लाऊड सेवा असून ती आपल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून सहज उपलब्ध



या ड्राइव्हच्या माध्यमातून आपण आपला डेटा संगणकावर सहज शेअर करू शकतो.

 गुगल ड्राइव्हविषयी माहिती

गुगल ड्राइव्ह ही गुगलची क्लाऊड सेवा असून ती आपल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते. जर आपण मोबाइलवर याचे स्वतंत्र अॅप डाऊनलोड केले तर मोबाइलवरही ही सेवा उपलब्ध होऊन मोबाइलमधील फोटो, व्हिडीओज, पीडीएफ फाइल्स आदी गोष्टी आपण सहजपणे ड्राइव्हवर सेव्ह करून ठेवू शकतो. या ड्राइव्हच्या माध्यमातून आपण आपला डेटा संगणकावर सहज शेअर करू शकतो. तसेच जीमेलवरच्या अटॅचमेंट्स आपण थेट गुगल ड्राइव्हवरच डाऊनलोड करू शकतो. जेणेकरून आपल्या संगणकात किंवा अन्य कुठे वेगळी स्टोटरेज जागा खर्च करण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला गुगल आपल्याला पंधरा जीबीचे क्लाऊड स्टोअरेज मोफत उपलब्ध करून देते. याशिवाय गुगलच्या विविध सुविधा तुम्ही वापरल्या तर त्यावरही तुम्हाला ड्राइव्हची स्टोअरेज स्पेस मोफत दिली जाते. उदाहणार्थ, तुम्ही क्विक ऑफिस डाऊनलोड केले तर तुम्हाला दहा जीबीचे अतिरिक्त क्लाऊड स्टोअरेज उपलब्ध होऊ शकते. तसेच विविध मोबाइल कंपन्यांच्या असलेल्या टाय-अपमुळे आणखी स्टोअरेज क्षमता मिळणे शक्य होते. यामध्ये एका कंपनीशी असलेल्या सहकार्य करारानुसार गुगल शंभर जीबीची स्टोअरेज जागा मोफत देते, तर वीस हजार गाण्यांचा साठा असलेले गुगल म्युझिकची सुविधा क्लाऊड स्टोअरेजच्या स्पेसव्यतिरिक्त दिली जाते. म्हणजे ही गाणी साठवण्यासाठीची क्षमता आपल्याला मोफत मिळते.

No comments:

Post a Comment