सातारा मधील विविध पुरोगामी,आंबेडकरवादी पक्ष,संघटना व व्यक्तीच्या वतीने हैद्राबाद विद्यापीठातील आंबेडकरी चळवळीतील कृतीशील कार्यकर्ता व विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला यास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री श्रुती इराणी,केंद्रीयमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सांगन्यावरून,आलेल्या दबावामुळे व कुलगुरू अप्पा राव पोलीले यांनी कोणतीही चौकशी न करता केलेल्या निलंबनामुळे कोंडीत सापडल्याने एकाकी पडल्याने आत्महत्या करावी लागली.वरील संबंधित घटनेची व लोकांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी व रोहित वेमुला हा वर्ण-जाती-वर्ग शोषण व जातीयवादी मानसिकता असलेल्या व्यवस्थेचा बळी ठरला याचा तीव्र निषेध करण्यासाठी,पुन्हा अशा घटना घडू नयेत व या घटनेचे योग्य विश्लेषण व्हावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,शाहू चौक,येथे शुक्रवार २९ जानेवारी २०१६ रोजी सायं.६.३० वा जाहीर निषेध सभेचे आयोजन केले आहे.
वरील प्रकारच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे.समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही पक्ष,संघटना व व्यक्ती करीत आहेत.यामुळे सामाजिक वातावरणात तणाव निर्माण होऊ लागला आहे.पुरोगामी विचारांचे व अहिंसेच्या मार्गाने कार्य करणारे नेते डॉ.नरेंद्र दाभोळकर,कॉ.गोविंद पानसरे व डॉ.एम.एम.कलबुर्गी यांची दिवसा ढवळया गोळ्या घालून त्या झाली.हि बाब जशी अतिशय निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी आहे.रोहित वेमुला याची आत्महत्या हि देखील अतिशय निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे.आमच्या मते रोहित वेमुला याची आत्महत्या हा डॉ.नरेंद्र दाभोळकर,कॉ.गोविंद पानसरे व डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या साखळीतील पुढचा खूनच आहे.फरक एवढाच आहे की खून अप्रत्यक्ष पद्धतीने डावपेच करून केला आहे.
पुढे अशा घटना टाळण्यासाठी या सर्व बाबींकडे आताच गंभीरपणे पाहिले पाहिजे.यासाठीच या जाहीर निषेध सभेचे आयोजन केले यामध्ये किशोरभाऊ तपासे(आर.पी.आय.प्रदेश उपाध्यक्ष), उपराकार लक्ष्मण माने(माजी आमदार)डॉ.यशवंतराव पाटणे सर(प्राचार्य,कला व वाणिज्य महाविद्यालय,सातारा),डॉ.हमीद दाभोळकर(सामाजिक कार्यकर्ते,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,महाराष्ट्र)विजय बडेकर(नगराध्यक्ष,सातारा),जयवंत भोसले(उपनगराध्यक्ष,सातारा),विजय मांडके(जेष्ठ पत्रकार)शिवाजी राऊत सर(विचारवंत व उपप्राचार्य,अनंत इंग्लिश स्कूल,सातारा)सचिन जवळकोटे(संपादक,लोकमत),सुदर्शन इंगळे(आंबेडकरवादी विचारवंत,प्रशासनिक अधिकारी,एल.आय.सी.) राजेंद्र भिंगारदेवे (प्राचार्य,क्रांतीस्मृती डी.एड.कॉलेज),अमर गायकवाड(अध्यक्ष,क्रांती थियेटर्स),तुषार भद्रे(विचारवंत व जेष्ठ रंगकर्मी),अण्णा वायदंडे (आर.पी.आय.प्रदेश उपाध्यक्ष,मातंग आघाडी),नासीर शेख(माजी नगरसेवक),संदीप फणसे(संपर्क प्रमुख रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन,)किशोर गालफाडे (युथ जिल्हाध्यक्ष ,आर पी आय)मारुती बोभाटे(उपाध्यक्ष,स्वाभिमानी रिपब्लिकन)आदी सातारा शहरातील विविध पुरोगामी ,आंबेडकरीवादी पक्ष,संघटना,व व्यक्ती सहभागी होणार आहेत.
या जाहीर निषेध सभेस सातारमधील पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, शांततावादी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करन्यात आले आहे.
निमंत्रक गणेश दुबळे सर
अध्यक्ष,शिवांतिका सामाजिक व शैक्षणीक विकास संस्था,
४६७,मंगळवार पेठ,सातारा
९३२६६५५२११
मा.संपादक सो.
आपल्या लोकप्रिय/चँनेल मध्ये प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती प्रत-शहर पोलिस प्रमुख,सातारा मुख्याधिकारी सो,नगरपरिषद सातारा
No comments:
Post a Comment