एकदा वाचा फक्त
2 मिनिट लागतील.
" ओळख " .
या नावाचा पाठ पुढच्या वर्षी
इ.7 वी ला असणार आहे,
त्याचा हा संदर्भ . नगर जिल्ह्यात दुर्गम भागात
अकोले येथील एका
प्राथमिक शाळेत एक शिक्षक
काही दिवसापुर्वीच रुजू झाले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी
शिक्षक खूप घाबरलेले,
गांव कसं असेल, तेथील पोरं
कशी असतील,
सहकारी कसे असतील, असे
नाना विचार त्याच्या डोक्यात
येत होते .
शाळेची वेळ झाली शिक्षक शाळेत
हजर झाले मुख्याध्यापक म्हणाले,
गुरुजी तुम्हांला त्या कोप-यात
असलेल्या वर्गावर जायचे आहे.
शिक्षकाला थोडं अवाक वाटलं,
शेवटचा अन् तोही कोप-यातला
वर्ग ? शिक्षक नाइलाजास्तव त्या
वर्गात गेले .
पाहिलं, तर काय, सर्व मुलांनी
नवीन गुरुजींच्या स्वागतासाठी
फूलं आणून ठेवलेली...
टाळ्यांच्या गजरात मुलांनी
गुरुजींचे स्वागत केले .
वर्गातील पट सतरा,
सर्व मुलं हजर,
एकदम टापटिप ...
पाहून शिक्षकाला बरं वाटलं,
पूर्वी मनात असलेल्या शंका
कुठे नाहिशा झाल्या,
कळलेच नाही.
त्याच शाळेतील एक शिक्षिका
आपल्या लहान दोन वर्षाच्या
बाळाला रोज शाळेत
आणत असत. ते इवलंस,
गोंडस मूल दिवसभर
या वर्गात, त्या वर्गात फिरत असे.
या नवीन आलेल्या
गुरुजींच्या वर्गात ते मूल
रोज भेट देत असे,
त्याचीही सवय सर्व शाळेला
झालेली होती .
एक दिवस ते बाळ
शाळेत आलं, मात्र,
या नवीन आलेल्या
गुरुजीच्या वर्गात,
मात्र आल नाही .
गुरुजी त्याची
वाट पाहत होते,
बराच वेळ झाला,
मूल काही आल नाही,
आता गुरुजीलाच वाटलं
आपणच जाऊन,
त्याला भेटून यावं,
लगबगीने गुरुजी उठले,
त्या बाईंच्या वर्गात गेले,
पाहिलं तर मूल तिथंही नव्हतं,
बाई म्हटल्या "गुरुजी बाळ तर
तुमच्याच कडे आलंय,
कुठं गेलं असेल ते "?
आख्खी शाळा त्या बाळाला
शोधत होती. सगळा परिसर
पिंजून काढला. बाळ मात्र,
कुणालाच गवसलं नाही.
त्याच्या आईने आक्रोश केला.
बाळ गेलं कुठं कुणालाच कळेना.
..गुरुजी शांत मनाने विचार करत
शाळेच्या झेंड्याला टेकून बसले.
सर्व वातावरण नि :शब्द झालं. अचानक, सर्व शाळेवर दु:खाचं
सावट पसरलं.
गुरुजी कुणालाही न सांगता
शाळेच्या मागे अर्धवट बांधलेल्या
पाण्याच्या टाकिकडे गेले,
आंत डोकावुन पाहिलं ...
पाहतांच त्यांचं अवसानच गळालं,
मनात आलेली शंका खरी ठरली
होती. बाळ आंत पडून गुदमरुन
अंत्यस्थ झालं होतं.
आईच्या दु:खाला सिमाच नव्हती.
एकुलतं एक मूल आज थोड्याशा
दुर्लक्षामुळे हातचं गेलं होतं.
सर्व गांव शाळेत जमा झालं.
बाळाच्या बापाला निरोप पाठवला.
तोवर आईने निर्णय घेतला,
बाळाच्या अंत्यविधिचा. सर्वांना आश्चर्य वाटलं. आईची इच्छा,
म्हणून बाळाच्या अंत्ययात्रेला
सुरुवात झाली. आई देखील
त्या बाळाच्या सोबत होती.
चालताना आई मात्र आपल्या
घड्याळाकडे पाहत होती.
कुणालाच काही कळेना,
बाई असं कां करताय.
अंत्ययात्रा स्मशानात जाऊन
पोहचली. लोकांनी त्या बाळाला
पुरायला सुरुवात केली, तोच
आईने जोरात आवाज दिला,
"थांबा " सगळ्यांना वाटलं,
कदाचित मुलाचा बाप
येत असेल, पण तसंही नव्हतं.
थोडा वेळ आईने
बाळाला निरखून पाहिलं आणि..
काही क्षणांतच वैध्यकीय पथक
तिथं दाखल झालं... आईला बरं वाटलं. त्या पथकाने बाळाचे डोळे यशस्वीरित्या काढले आणि..
परत गेले.
आईने जन्मतांच बाळाचे डोळे
दान केले होते आणि ते डोळे दान
करण्यासाठी ती थांबून होती.
बाळाचं शेवटचं दर्शन तिनं घेतलं,
बाळाला मुठमाती दिली,
जो तो आपआपल्या घरी
निघुन गेला.
या घटनेला दोन तन वर्ष झाली.
आता त्या बाळाला सगळेच विसरले
होते. बाळ आता विस्मृतीत
जमा झालेलं होतं.
एके दिवशी त्या बाई त्यांच्या
नवऱ्यासोबत गावाला जायचं,
म्हणून नगरच्या बसस्टॅंडवर
बसले होते. अचानक तिच्या
डोळ्यातून अश्रु येऊ लागले,
बाई हंबरडा फोडून रडू लागली.
तिच्या नवऱ्यालााही
कळत नव्हतं काय झालं.
सगळी गर्दी जमा झाली.
डेपो मॅनेजरही आले ..
बाईला विचारलं काय झालं ?
बाई जोरात नवऱ्याला
घट्ट बिलगून म्हणाल्या.
"आपल बाळ जिवंत आहे "
काही क्षणापूर्वी एका बसमधे
बसलेलं पाच सहा वर्षाचं बाळ
तिच्याकडे एक टक पाहत होतं.
त्या बाळाच्याही डोळ्यातून
अचानक अश्रु आले होते.
त्याच्या डोळ्यांनी
तिला ओळखलं होतं..
तिलाही ते डोळे पाहिल्याचा
भास झाला आणि आपल्या
बाळाची आठवण आली ..
डेपो मॅनेजरला
सगळा प्रकार कळला.
त्याने ती बस फोन करुन
पुढच्या स्टाँपवर थांबवली.
चौकशी केली तर,
त्या बाळाचे डोळे,
त्या बसमधील बाळाला
3 वर्षापूर्वी यशस्वीरित्या
प्रत्यारोपण केले होते ...
ते डोळे अजूनही
त्या आईला
ओळखत होते....
2 मिनिट लागतील.
" ओळख " .
या नावाचा पाठ पुढच्या वर्षी
इ.7 वी ला असणार आहे,
त्याचा हा संदर्भ . नगर जिल्ह्यात दुर्गम भागात
अकोले येथील एका
प्राथमिक शाळेत एक शिक्षक
काही दिवसापुर्वीच रुजू झाले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी
शिक्षक खूप घाबरलेले,
गांव कसं असेल, तेथील पोरं
कशी असतील,
सहकारी कसे असतील, असे
नाना विचार त्याच्या डोक्यात
येत होते .
शाळेची वेळ झाली शिक्षक शाळेत
हजर झाले मुख्याध्यापक म्हणाले,
गुरुजी तुम्हांला त्या कोप-यात
असलेल्या वर्गावर जायचे आहे.
शिक्षकाला थोडं अवाक वाटलं,
शेवटचा अन् तोही कोप-यातला
वर्ग ? शिक्षक नाइलाजास्तव त्या
वर्गात गेले .
पाहिलं, तर काय, सर्व मुलांनी
नवीन गुरुजींच्या स्वागतासाठी
फूलं आणून ठेवलेली...
टाळ्यांच्या गजरात मुलांनी
गुरुजींचे स्वागत केले .
वर्गातील पट सतरा,
सर्व मुलं हजर,
एकदम टापटिप ...
पाहून शिक्षकाला बरं वाटलं,
पूर्वी मनात असलेल्या शंका
कुठे नाहिशा झाल्या,
कळलेच नाही.
त्याच शाळेतील एक शिक्षिका
आपल्या लहान दोन वर्षाच्या
बाळाला रोज शाळेत
आणत असत. ते इवलंस,
गोंडस मूल दिवसभर
या वर्गात, त्या वर्गात फिरत असे.
या नवीन आलेल्या
गुरुजींच्या वर्गात ते मूल
रोज भेट देत असे,
त्याचीही सवय सर्व शाळेला
झालेली होती .
एक दिवस ते बाळ
शाळेत आलं, मात्र,
या नवीन आलेल्या
गुरुजीच्या वर्गात,
मात्र आल नाही .
गुरुजी त्याची
वाट पाहत होते,
बराच वेळ झाला,
मूल काही आल नाही,
आता गुरुजीलाच वाटलं
आपणच जाऊन,
त्याला भेटून यावं,
लगबगीने गुरुजी उठले,
त्या बाईंच्या वर्गात गेले,
पाहिलं तर मूल तिथंही नव्हतं,
बाई म्हटल्या "गुरुजी बाळ तर
तुमच्याच कडे आलंय,
कुठं गेलं असेल ते "?
आख्खी शाळा त्या बाळाला
शोधत होती. सगळा परिसर
पिंजून काढला. बाळ मात्र,
कुणालाच गवसलं नाही.
त्याच्या आईने आक्रोश केला.
बाळ गेलं कुठं कुणालाच कळेना.
..गुरुजी शांत मनाने विचार करत
शाळेच्या झेंड्याला टेकून बसले.
सर्व वातावरण नि :शब्द झालं. अचानक, सर्व शाळेवर दु:खाचं
सावट पसरलं.
गुरुजी कुणालाही न सांगता
शाळेच्या मागे अर्धवट बांधलेल्या
पाण्याच्या टाकिकडे गेले,
आंत डोकावुन पाहिलं ...
पाहतांच त्यांचं अवसानच गळालं,
मनात आलेली शंका खरी ठरली
होती. बाळ आंत पडून गुदमरुन
अंत्यस्थ झालं होतं.
आईच्या दु:खाला सिमाच नव्हती.
एकुलतं एक मूल आज थोड्याशा
दुर्लक्षामुळे हातचं गेलं होतं.
सर्व गांव शाळेत जमा झालं.
बाळाच्या बापाला निरोप पाठवला.
तोवर आईने निर्णय घेतला,
बाळाच्या अंत्यविधिचा. सर्वांना आश्चर्य वाटलं. आईची इच्छा,
म्हणून बाळाच्या अंत्ययात्रेला
सुरुवात झाली. आई देखील
त्या बाळाच्या सोबत होती.
चालताना आई मात्र आपल्या
घड्याळाकडे पाहत होती.
कुणालाच काही कळेना,
बाई असं कां करताय.
अंत्ययात्रा स्मशानात जाऊन
पोहचली. लोकांनी त्या बाळाला
पुरायला सुरुवात केली, तोच
आईने जोरात आवाज दिला,
"थांबा " सगळ्यांना वाटलं,
कदाचित मुलाचा बाप
येत असेल, पण तसंही नव्हतं.
थोडा वेळ आईने
बाळाला निरखून पाहिलं आणि..
काही क्षणांतच वैध्यकीय पथक
तिथं दाखल झालं... आईला बरं वाटलं. त्या पथकाने बाळाचे डोळे यशस्वीरित्या काढले आणि..
परत गेले.
आईने जन्मतांच बाळाचे डोळे
दान केले होते आणि ते डोळे दान
करण्यासाठी ती थांबून होती.
बाळाचं शेवटचं दर्शन तिनं घेतलं,
बाळाला मुठमाती दिली,
जो तो आपआपल्या घरी
निघुन गेला.
या घटनेला दोन तन वर्ष झाली.
आता त्या बाळाला सगळेच विसरले
होते. बाळ आता विस्मृतीत
जमा झालेलं होतं.
एके दिवशी त्या बाई त्यांच्या
नवऱ्यासोबत गावाला जायचं,
म्हणून नगरच्या बसस्टॅंडवर
बसले होते. अचानक तिच्या
डोळ्यातून अश्रु येऊ लागले,
बाई हंबरडा फोडून रडू लागली.
तिच्या नवऱ्यालााही
कळत नव्हतं काय झालं.
सगळी गर्दी जमा झाली.
डेपो मॅनेजरही आले ..
बाईला विचारलं काय झालं ?
बाई जोरात नवऱ्याला
घट्ट बिलगून म्हणाल्या.
"आपल बाळ जिवंत आहे "
काही क्षणापूर्वी एका बसमधे
बसलेलं पाच सहा वर्षाचं बाळ
तिच्याकडे एक टक पाहत होतं.
त्या बाळाच्याही डोळ्यातून
अचानक अश्रु आले होते.
त्याच्या डोळ्यांनी
तिला ओळखलं होतं..
तिलाही ते डोळे पाहिल्याचा
भास झाला आणि आपल्या
बाळाची आठवण आली ..
डेपो मॅनेजरला
सगळा प्रकार कळला.
त्याने ती बस फोन करुन
पुढच्या स्टाँपवर थांबवली.
चौकशी केली तर,
त्या बाळाचे डोळे,
त्या बसमधील बाळाला
3 वर्षापूर्वी यशस्वीरित्या
प्रत्यारोपण केले होते ...
ते डोळे अजूनही
त्या आईला
ओळखत होते....
No comments:
Post a Comment