Tuesday, 10 November 2015

शेर-ए-म्हैसूर -टीपू सुलतान

🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
 
मूळनाव: फतेहअली टीपू
जन्म: 10 नोव्हेंबर, 1750
मृत्यू: 4 मे, 1799

"टीपू सुलतान हे उत्कृष्ठ अर्थतद्न्य, समाजसुधारक, कवी,कुशल प्रशासक,आधुनिक तंञाचे पुरस्कर्ते,पराक्रमी सेनानी आणि दूरदृष्टीचे, प्रजाहितदक्श व लोककल्याणकारी सुलतान होते".
टीपू सुलतान यांचे मुळनाव फतेहअली टीपू असे होते. राज्याभिषेक झाल्यावर ते "सुलतान" बनले व पुढे "टीपू सुलतान" या नावाने लोकप्रिय झाले.

टीपू सुलतान हे मुस्लिम होते,तर त्यांची प्रजा हिंदू होती. आपल्या प्रजेवर त्यांनी मनापासून प्रेम केले. सध्या कर्नाटकात कावेरी नदीवर जेथे प्रसिद्ध कृष्णराज सागर धरण आहे त्या जागी टीपूंनी एक छोटे धरण बांधले होते. टीपू सुलतान यांच्या कारकिर्दीत म्हैसूर राज्याचा व्यापार श्रीलंका, अफगाणिस्तान,फ्रान्स,टर्की,रशिया,चीन,इराण इ.देशांशी चालत असे. टीपू सुलतान यांना उर्दू,कन्नड,फारसी,अरेबिक,फ्रेंच या भाषा अवगत होत्या.

 1791 मध्ये जेव्हा पेशव्यांच्या फौजांनी शृंगेरीपीठाच्या शंकराचार्यांच्या मठावर हल्ला करून  लूटमार व हत्या केल्या. तेव्हा शंकराचार्यांनी टीपूंना मदतीचे विनंतीपञ धाडले. टीपूंनी लुटारू पेशव्यांना पळवून लावले व मठाची दुरूस्तीही केली. 1782 ते 1799 या दरम्यान टीपू सुलतान यांनी विविध मंदिरांना मदत दिल्याच्या 34 सनद सध्या उपलब्ध आहेत.

टीपू सुलतान हे आपल्या एका फ्रेंच मिञासह म्हैसूरच्या जंगलात शिकारीला गेलेले असताना हातातील छोट्या खंजरने हिंस्ञ वाघाला ठार केले. तेव्हापासून टीपू हे "शेर-ए-म्हैसूर/ म्हैसूरचा वाघ" म्हणून ओळखले जावू लागले.मुळातच त्यांना वाघ या प्राण्याविषयी विशेष आकर्षण होते. त्यांचा ध्वज वाघाच्या रंगाचा,सिंहासन वाघाच्या आकाराचे, सैन्याचा गणवेशही वाघाच्या रंगाचा होता.
टीपूंनी आपल्या कारकिर्दीत नवीन कालगणना, नवी नाणी, नवी वजनमापे व प्रशासनात सात नवी खाती सुरू केली.  तसेच,  जनतेच्या सोयीसाठी अनेक मंदिरे,मशिदी, रस्ते बांधले, रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली, शेतकरयांसाठी विहिरी खोदल्या, कालवे बांधले, जागोजागी छोटी-छोटी धरणे बांधली.
...........................................
टीपू सुलतान यांची प्रसिद्ध विधाने:
1."शेती ही देशाची रक्तवाहिनी आहे."
2."गिधाडासारखे 100 वर्षे जगण्यापेक्शा वाघासारखे एकच दिवस जगणे मी पसंत करीन."
.......................................................
टीपूंची लष्करी सज्जता:

इंग्रजांचा धोका ओळखून त्यांचे शञू असलेल्या फ्रेंचांशी चांगले संबंध स्थापित करून टीपूंनी आधुनिक कवायती सैन्य उभारले होते. टीपू सुलतान यांच्या नेतृत्वात म्हैसूर लष्कराने "आधुनिक वैन्यानिक लष्करी शाळा" भारतात प्रथमच सुरू करून  या नव्या क्शेञाची भारतीय राज्यकर्त्यांना ओळख करून दिली.  फ्रेंच सेनानी नेपोलियन बोनापार्ट याच्याशी पञव्यवहार करून राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. नेपोलियनने इजिप्त जिंकल्यानंतर भारतात यावे व इंग्रजांना हाकलून देवून भारत स्वतंञ करण्यास टीपूंना सहाय्य करावे, अशी ही योजना होती.पण त्याचवेळी फ्रेंच राज्यक्रांतीला सुरूवात झाल्याने ही महत्त्वाकांक्शी योजना बारगळली.इंग्रजांविरूद्ध ऐत्देशीय राजांची आघाडी करण्याचाही प्रयत्न टीपूंनी केला. पण त्यांना कोणाची साथ मिळाली नाही. उलट, पेशवा व निजाम यांनी नेहमी इंग्रजांनाच सहाय्य केले.
💥क्शेपणास्ञ प्रणेते:
                        टीपू सुलतान
युद्धासाठी आवश्यक अशा अनेक आधुनिक तंञांचा व शस्ञास्ञांचा टीपूंनी शोध लावला. यातील अत्यंत महत्त्वाचे असे आधुनिक शस्ञ म्हणजे "क्शेपणास्ञ" होय.टीपूंच्या या शोधाचा उल्लेख ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या "अग्निपंख " या आत्मचरिञातही आहे. म्हणजेच "टीपू सुलतान हे आधुनिक क्शेपणास्ञाचे जनक" होय. टीपूंच्या वीरमरणानंतर यातीलच काही क्शेपणास्ञांचा वापर करून  इंग्रजांनी वॉटर्लूच्या युद्धात नेपोलियनचा पराभव केला. पण अशी क्शेपणास्ञे बनवणे इंग्रजांना जमले नाही.
......................................................
टीपूंचे वीरमरण:

टीपू सुलतान यांचा सेनानी मीर सादिक याला इंग्रजांनी म्हैसूरचा सुलतान करण्याचे आश्वासन देवून फितूर केले. या लोभापोटीच त्याने 1799 च्या श्रीरंगपट्टणच्या चौथ्या युद्धात टीपूंच्या क्शेपणास्ञ साठ्यात पाणी सोडून हजारो क्शेपणास्ञे निकामी केली. अशा विश्वासघातकी लोकांमुळेच 1799 च्या युद्धात शेर-ए-म्हैसूर टीपू सुलतान यांना वीरमरण आले. या युद्धात हैदराबादचा निजाम व पुण्याच्या पेशव्यांनी टीपूंविरूद्ध इंग्रजांना मदत केली.टीपू जिवंत होते तोपर्यंत संपूर्ण भारत जिंकण्याचे इंग्रजांचे स्वप्न अपूर्ण होते.यानंतर माञ इंग्रजांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण झाले.ू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
"जो लढा था सिपाहीयों की तरह ऐसा बादशहा भारतमें न हुवा,
रूह  तो  हो चुकी  थी तनसे  जुदा
हाथ तलवारसे जुदा न हुवा."
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
शेर-ए-म्हैसूर टीपू सुलतान जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
          

No comments:

Post a Comment